झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. याला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत.
‘नाळ’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले होते. आता हाच चैतू मोठा झाला आहे. ‘नाळ २’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याची पहिली झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
या टीझरची सुरुवातीला छोटा चैतू धावत जाऊन आपल्या खऱ्या आईला छत्री देताना दिसतो. त्यानंतर आता चैतू हा मोठा झाला आहे आणि तो त्याच्या खऱ्या आईला सायकलवर बस असे सांगताना दिसत आहे. यानंतर त्याची खरी आई सायकलवर बसते. चैतू आई बसली की नाही याची खात्री करतो आणि तिला चालवू का असे विचारतो. यावेळी चैतू आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो, असे ‘नाळ २’ च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
‘नाळ २’ च्या टीझरला प्रेक्षकांचीही पसंती मिळताना दिसत आहे. या टीझरवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा : खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित
या चित्रपटात श्रीनिवास पोकळे हा चैतन्य म्हणजे चैत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याबरोबरच नागराज मंजुळे हे चैत्याचे वडील आणि दीप्ती देवी पार्वती म्हणजे चैत्याची खरी आईचे पात्र साकारत आहे.