मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मुक्ता आणि नम्रताचा सहज सुंदर अभिनय, दोघींची जुगलबंदी, कथेचा सामाजिक विषय या सगळ्यांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वेच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. या आनंदाच्या वातावरणात सध्या चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रमोशनमध्ये प्रचंड व्यग्र आहे. अशावेळी या कलाकारांना आपल्या कुटुंबीयांना फारसा वेळ देता येत नाही. परंतु, आपल्या कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांना एवढं मोठं यश मिळालेलं असतं. सध्या नम्रता संभेरावने शेअर केलेली अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिचा पती आणि गोंडस लेक रुद्राजचं कौतुक करत आपण लवकरच एकत्र ‘नाच गं घुमा’ चित्रपट पाहुया असं आश्वासन त्यांना दिलं आहे.

हेही वाचा : मास्तरीणबाईंच्या ऑफस्क्रीन कुटुंबाला पाहिलंत का? शिवानी रांगोळेने शेअर केला लग्नातील खास फोटो

नम्रता संभेरावची पोस्ट

“मेरे दो अनमोल रतन! ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाला हाऊसफुल्ल चालतोय…प्रेम मिळतंय फोन येत आहेत. कौतुक होतंय, सगळं छान घडतंय पण, माझ्या या दोन मुलांबरोबर आणि कुटुंबासह हा क्षण कधी एकदा अनुभवतेय असं झालंय. आम्ही सध्या चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना भेटत आहोत. त्यामुळे थोडं लांब आहोत पण, नक्कीच लवकर ‘नाच गं घुमा’ बघू एकत्र…कारण, रुद्राज खूप जास्त उत्सुक आहे सिनेमा बघण्यासाठी आणि हे ऐकून मी जास्त खूश झाले आहे.” असं नम्रताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये मराठमोळ्या तरुणाचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स; संजू राठोड कमेंट करत म्हणाला…

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या चित्रपटाला सहा सर्जनशील निर्माते लाभले आहेत. सध्या या चित्रपटाला समस्त महाराष्ट्रातून पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namrata sambherao shares special post for son rudraaj and husband with cute family photo sva 00
Show comments