ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत खूप काम केलं आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या ते ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहेत. हा चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव व मकरंद अनासपूरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी नाव न घेता मराठा आरक्षणाबद्दल मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी २४ तास’ ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांना मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण व त्यांच्या मागण्या यासंदर्भात नाव न घेता प्रश्न विचारण्यात आला. आरक्षणासाठी तणाव निर्माण केला जात आहे, ज्याप्रकारचे इशारे दिले जात आहेत, ज्या मागण्या केल्या जात आहेत, जातायत, त्या मागण्या साधन-सुचितेला धरून किंवा सामाजिक जाणीवांना धरून वाटतात का? असा प्रश्न नाना पाटेकरांना विचारण्यात आला होता.

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो…”

उत्तर देत नाना पाटेकर म्हणाले, “मी कुठल्याही जातीचा असेन, माझ्या जातीच्या संदर्भात जर तू काही बोलत असशील तर सगळ्या मोठ्या जाती-समूहातला मी एक बिंदू म्हणून मला कळायला पाहिजे की हे मला वापरत आहेत का? मला हे लक्षात यायला पाहिजे. ज्या क्षणाला मी त्यांना माझा वापर करू देईन त्या क्षणाला ते मला वापरतील. पण त्यांना स्वतःचा वापर करू द्यायचा की नाही हे मी ठरवायचं आहे. अशी खूप मंडळी आहेत जी तुम्हाला वापरू इच्छिते, पण सरतेशेवटी हे तुमच्यावर आहे.”

“नितीन गडकरी राजकारणातले अजातशत्रू”, नाना पाटेकरांचे विधान; देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाले, “त्यांचं बोलणं…”

पुढे त्यांनी बसवर झालेल्या दगडफेकीचा व जाळपोळीचा उल्लेख केला. “मी हे का जाळायचं? मी हे का फोडायचं? हे मी ठरवायचं आहे. सरतेशेवटी हे माझं आहे ना.. सगळंच माझं आहे. मला काय अधिकार आहे बस जाळण्याचा, मला काय अधिकार आहे काचा फोडण्याचा, बरं तेवढ्याने माझं सरकार ऐकणार असेल तर मग इतकं बहिरं आहे का माझं सरकार? सर्वात आधी तुमचं म्हणणं मुद्देसुदपणे सरकारसमोर मांडा,” असं नाना पाटेकर म्हणाले.

“अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…

दरम्यान, “तुमची भीती वाटणं बंद झालंय, सामान्य जनता म्हणून तुमची राजकारण्यांना भीती वाटत नाही. ज्या दिवशी ती भीती वाटायला लागेल, त्या दिवशी ते पुन्हा सुधारतील,” असं नाना पाटेकर म्हणाले. सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar commented on maratha reservation and manoj jarange patil hrc
First published on: 25-12-2023 at 12:12 IST