ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या नवीन मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नाना यांचा ओले आले नावाचा सिनेमा ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते मकरंद अनासपुरे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

नितीन गडकरींचं भाषण आपण शांतपणे ऐकत असल्याचं नाना म्हणाले. “गडकरी बोलू लागले की मी शांतपणे ऐकत बसतो. प्रत्येक गोष्ट ते किती छान पटवून देतात. सगळी आकडेवारी नीट सांगतात. काहीवेळी त्यांची टिंगल होते की इतकी आकडेवारी वगैरे. ते सगळं सोडून द्या. पण नितीन गडकरी राजकारणातले अजातशत्रू आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांमधील आवडती व्यक्ती नितीन गडकरी आहेत,” असं नाना पाटेकर ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो…”

नितीन गडकरींनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. “फडणवीस बोलायला लागल्यानंतर त्यांचं बोलणं मुद्देसूद होतं, अघळपघळ पसारा नसतो. मला ते ऐकायला छान वाटतं. मला वाटतं की मी काहीतरी त्याच्याबद्दल बोलू शकतो, माझं मत मांडू शकतो. राजकारणात सातत्य असलेली मंडळी आता कमी व्हायला लागली आहे,” असं नाना पाटेकर देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाले.

“अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…

या मुलाखतीत नाना पाटेकरांनी आपल्याला राजकारण कळत नाही, असं विधान केलं. तसेच राजकारणाबाबत कोणतंही भाकित करता येत नसल्याचंही ते म्हणाले.