‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘हम दोनों’, ‘वजूद’, ‘खामोशी’, ‘देऊळ’, ‘वेलकम बॅक’, ‘नटसम्राट’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘ओले आले’, अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) होय. चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांतही काम केले आहे. आता एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी त्यांच्या एका नाटकाचा प्रसंग सांगितला आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच ‘बोल भिडू’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. लेखक अरविंद जगताप यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत नाना पाटेकरांशी बोलताना अरविंद जगताप यांनी म्हटले की, मी ऐकलं होतं की, एकदा एका नाटकाच्या प्रयोगात नटीच आली नव्हती आणि तरी तुम्ही प्रयोग केला. त्यावर बोलताना नाना पाटकेरांनी म्हटले, “आमच्या नाटकात काम करणारी जी नटी होती, तिचा नवरा वारला. सकाळी कळलं की, जी नटी होती तिचा नवरा वारलाय. अर्थात ती येणार नाही. आम्ही मेकअप करून तयार होतो. हाऊसफुल शो होता. त्या नाटकाला स्मिता सगळं शूटिंग वगैरे अ‍ॅडजस्ट करून आली होती. पडदा उघडला. मी म्हटलं की, गोंधळ असा झालेला आहे की, आमची मुख्य नटी आहे आणि तिचं मोठं काम आहे. माझे तिच्याबरोबर सीन्स आहेत. तिचा नवरा वारल्यामुळे ती नाहीये. त्यामुळे आजचा प्रयोग नाही करता येणार. त्यामुळे माफ करा, असं आम्ही म्हणालो.”

Nana Patekar recalls memories of smita patil
“स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

“पडदा बंद होत होता. मी म्हटलं एक मिनीट थांब पडदा उघड. मग पुन्हा पडदा उघडला. मी प्रेक्षकांना म्हटलं की, एका पद्धतीनं प्रयोग होऊ शकेल. ती स्टेजवर आहे, असं मी मानेन आणि तसे सीन करेन. तिचे डायलॉग कोणीतरी आतून माईकवरून बोलेल. आता कोण बोलेल? ते मला आता या क्षणाला माहीत नाही. तसा प्रयोग करता येईल. सगळे प्रेक्षक म्हटले की, हो चालेल. प्रयोग झाल्यानंतर स्मिता आतमध्ये येऊन रडत होती. नाना, तू किती भाग्यवान आहेस, असं ती म्हणत होती. मी तिला म्हटलं की, मलाही माहीत नाही काही. याचा काही सराव केला नव्हता. फार काय होणार, आपल्यावर प्रेम करणारी माणसं समोर बसलेली असतात. झाली फजिती तर झाली. काय हरकत आहे? सतत डोक्यावर घ्यायला पाहिजे, असं कशाला?”

हेही वाचा: “मी निवृत्ती घेत नाहीये…”, विक्रांत मॅसीचं ‘त्या’ पोस्टबद्दल स्पष्टीकरण; म्हणाला, “मला एक मोठा…”

दरम्यान, नाना पाटेकरांनी अनेक चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी गंभीर, कधी विनोदी, कधी गुंड तर कधी हीरो, अशा सगळ्या भूमिकांतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. नाना पाटेकरांचे अनेक संवाद लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते.