‘ओले आले’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बापलेकाच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘ओले आले’च्या टीममधील नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे व विपुल मेहता यांनी लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांचा मुलगा मल्हारशी कसं नातं आहे, याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मल्हार माझा बाप आहे. या चित्रपटामध्येही या तसंच आहे. बाबा हे नको ना आता प्लीज, बाबा तू कोणाशी भांडू नकोस, बाबा कुणाला मारू नकोस. आपण सांगतो ना मुलांना, भांडण करून नको, कुणाला मारू नको, हे करू नको, ते करू नको, तसं तो निघताना मला शप्पथ सांगतो की कुणाला मारू नको प्लीज. तू सोडून दे, त्याकडे लक्ष देऊ नको असं तो म्हणतो. बाप कोण आहे हे मला काही कळतच नाही,” असं नाना मुलगा मल्हारशी असलेल्या नात्याबद्दल म्हणाले.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये १ तास १२ मिनिटांवर नाना पाटेकर मुलाबद्दल बोललेत, ते तुम्ही बघू शकता.

नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

“मी आता बाळच होत जाणार ना. परवा (१ जानेवारी रोजी) ७४ वं वर्ष लागेल. त्यादिवशी मस्त ३-४ चुली मांडायच्या. यायचं, प्रत्येकाने आपलं जेवण घ्यायचं आणि छान जेवायचं,” असा वाढदिवसाचा बेत नाना पाटेकर यांनी सांगितला. नाना पाटेकर यांना जेवण बनवायला खूप आवडतं. बरेच कलाकार अनेकदा त्यांनी बनवलेल्या जेवणाचं कौतुक करताना दिसतात.

“मी कुठल्याही जातीचा असेन…”, मराठा आरक्षणावर नाना पाटेकरांचे रोखठोक मत; म्हणाले, “माझं सरकार ऐकणार…”

दरम्यान, मल्हारबद्दल बोलायचं झाल्यास तो नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर यांचा मुलगा आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. आई व वडिलांचे फोटो तो बऱ्याचदा शेअर करत असतो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar talks about bonding with son malhar says he behave like my father hrc
Show comments