नाना पाटेकर यांच्या पत्नीचं नाव नीलकांती पाटेकर आहे. नाना व नीलकांती यांनी प्रेम विवाह केला होता, पण ते नंतर वेगळे राहायचे. नानांच्या आई व त्यांचा मुलगा मल्हार नीलकांती यांच्याबरोबर राहायचे, तर नाना एकटेच वेगळे राहायचे, असं त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे. नाना व नीलकांती यांची पहिली भेट कुठे झाली होती, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. अभिनयातील करिअर पत्नीमुळेच करू शकल्याचंही त्यांनी नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही नीलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,”हो. तेव्हाच भेटलो होतो. ती नाटकात काम करायची, ती बँकेत अधिकारी होती. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही १५०० मिळायचे. तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. त्यावेळी माहित नव्हतं यशस्वी होऊ की नाही,” असंही नाना यांनी नमूद केलं.

नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर नीलकांती यांनी एका चित्रपटात काम केलं होतं, पण नंतर त्यांनी चित्रपट केले नाहीत. त्याबद्दल नाना म्हणाले, “मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो.”

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

नाना पाटेकर व नीलकांती यांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. नीलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच नाना या क्षेत्रात करिअर करू शकले.

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

नाना पाटेकर व नीलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. तो नानांबरोबर नाम फाउंडेशनची कामं करतो. त्याने ‘द लिटिल गॉडफादर’ चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती. राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी मल्हारने सांभाळली होती. नाना पाटेकर यांच्या ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाच्या सीक्वेलसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar talks about wife neelkanti patekar say i made my career because of her help hrc
First published on: 24-06-2024 at 15:41 IST