सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरू झाली आहे, ती ‘श्यामची आई’ चित्रपटातील गाण्यांची. शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळेंनी या चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ ही प्रार्थना नव्या सुरात व चालीत गुंफुन आपल्यासमोर गाणं स्वरुपात आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी

या गाण्यासंदर्भात बोलताना महेश काळे म्हणाले, “या गाण्यासंदर्भात मला आकाश पेंढारकर यांचा फोन आला. मला ते म्हणाले,’तू गाणं गाशील का?’, मी त्या गाण्याचे शब्द पाहिले आणि पहिल्या दोन ओळी ऐकून माझा गाणं गाण्याचा निर्णय पक्का झाला. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिक भावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं. किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली. हे गाणं नसून प्रार्थना आहे, एक संवेदना आहे..हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.”

हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश काळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली ‘खरा तो एकाची धर्म’ ही प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुल्ली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे, तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब, अजय, अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आज अडकणार लग्नाच्या बेडीत; हळदी समारंभाचे फोटो आले समोर

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. शिवाय या चित्रपटात गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर ही तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award winner mahesh kale debut as music director shyamchi aai marathi movie pps
Show comments