सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा एक चाहतावर्ग आहे. आता तब्बल १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० सप्टेंबर २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

सोशल मीडियावर चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल एक टीझर प्रदर्शित केला आहे. यावेळचा प्रवास रेल्वेचा, कोकण रेल्वेचा म्हणत, नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट २० तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे टीझर मध्ये सांगण्यात आले आहे. सुश्रिया चित्र निर्मित हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, हेमल इंगळे, वैभव मांगले, निर्मिती सावंत हे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात अशोक सराफ बस कंडक्टरच्या भूमिकेत दिसले होते, आता मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ते टीसीच्या भूमिकेत दिसत आहेत.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करताना मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ‘नवरा माझा नवसाचा २’ ही नॉनस्टॉप कॉमेडी निघाली आहे गणपतीपुळ्याला. पण या वेळेला एसटी ने नाही तर कोकण रल्वेने. तुम्ही येताय ना हा प्रवास बघायला ? २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ’नवरा माझा नवसाचा २’प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: कोल्हापूरचा रंकाळा राहिला दूर, म्हणत फुकेत मध्ये “कहो ना प्यार है” गाण्यावर थिरकले अक्षरा-अधिपती

दरम्यान, १९ तारखेला निर्मात्यांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे उद्या कळेल असे म्हटले होते. त्यावेळी कंटक्टर असलेले अशोक सराफ टी सीच्या भूमिकेत गेलेले पाहायला मिळाले. आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे. अनेकांनी अशोक सराफ यांना चित्रपटात पाहण्याची पर्वणी असल्याचे म्हटले आहे.

आता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने जसे प्रेक्षकांचे मनोरंजन केले, प्रेक्षकांना खळखळून हसवले तशी कमाल आता या चित्रपटाचा दुसरा भाग करु शकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी कोकण रेल्वेने गणपतीपुळ्याला जाण्यचा प्रवास कसा असणार, चित्रपटाची कथा काय असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी होणार का? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.