सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता लोकप्रिय गायक व बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाला उत्कर्ष शिंदे?

उत्कर्ष शिंदेने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट शेअर करताना लिहिले, “केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’, हेमंत ढोमेंचा ‘झिम्मा’ आणि आता या वर्षी मराठी चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढविणारा क्लासिक चित्रपट आला आहे, ‘नवरा माझा नवसाचा-२’. मास्टर स्ट्रोक बाय मराठी चित्रपटांचे मास्टर ब्लास्टर लेजेंड सचिन पिळगांवकर सर. कौटुंबिक, परंपरा यांबद्दलची एक हृदयस्पर्शी कथा चित्रपटाची सांस्कृतिक खोली वाढवते, ज्यामुळे विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतील प्रेक्षकांना कौटुंबिक वारसा आणि वारशाचे महत्त्व कळू शकते.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Eknath Shinde
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
Image Of Chhagan Bhujbal And MLA Suhas Kande.
Chhagan Bhujbal : “भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी खुश असतो”, एकनाथ शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलून गेले
Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”
Image Of Ram Shinde And Ajit Pawar.
Ajit Pawar : “आपण हरलात ते योग्य झालं”, राम शिंदेंचे अभिनंदन करताना अजित पवारांची टोलेबाजी

“सांस्कृतिक प्रतिनिधित्वाच्या पलीकडे वैयक्तिक ओळखीमध्ये कुटुंबाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देते. हा प्रवास केवळ वचन पूर्ण करण्यापुरताच नाही, तर त्याची मुळे, याचा अत्यावश्यक भाग आहे, हे समजून घेण्याचा आहे. संपूर्ण चित्रपटात आपण वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक अपेक्षा यांच्यातील संघर्ष पाहतो, असा एक संघर्ष जो सार्वत्रिकपणे संबंधित आहे. हा चित्रपट कौटुंबिकतेवर केंद्रित झाला आहे.”

“हा चित्रपट क्षमा, समज व कौटुंबिक बंधांची ताकद यांबद्दलचे आवश्यक धडे शिकवतो. चांगल्या कौटुंबिक अन् सुसंस्कृततेवर आधारलेल्या या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुले आणि प्रौढ अशा दोघांच्याही अपेक्षा पूर्ण करणे. या संदर्भात मातब्बर कलाकारांचे विनोद तर आहेतच आणि सोबत उत्तम संगीत, गाणीदेखील आहेत. आदर्श आणि सचिनसरांनी गायलेले ‘डम डम डमरू वाजे’ गाणे सुरू होते आणि संपूर्ण थिएटर गायला-नाचायला सुरुवात करते. गाण्यांची उत्तम संगीत वापरून, प्रभावी रीतीने मांडणी करण्यात आली आहे.”

उत्कर्ष शिंदे इन्स्टाग्राम

“मनोरंजन आणि भावनिक खोली यांच्यातील समतोल ही बाब सुनिश्चित करतो की, कुटुंबे एकत्रितपणे या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात आणि जाताना आदर, परंपरा व वारसा यांसारख्या मूल्यांबाबतचे चर्चात्मक अर्थपूर्ण संदेश सोबत नेतात.”

“हा चित्रपट केवळ मनोरंजनच करीत नाही, तर कुटुंबांना त्यांच्या अनोख्या इतिहासाची प्रशंसा करण्यासाठी आणि सखोल बंध जोपासण्यासाठी प्रेरित करतो. हा चित्रपट पाहताना सर्व वयोगटांतील प्रेक्षक, कुटुंबे एकत्रितपणे फक्त आणि फक्त हसत आनंद घेत होते. अशोकसर, सुप्रिया पिळगांवकरजी, सिद्धूदादा, संजय पवारजी, स्वप्नीलदादा, हेमल इंगळे, वैभव मांगलेसर, निर्मितीताई, व सचिनसर यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा मास्टर स्ट्रोक बघण्यासारखा आहे.”

याच पोस्टमध्ये उत्कर्षने, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, श्रिया पिळगांवकर, सिद्धार्थ जाधव यांना टॅग करीत “आम्ही तुमच्यावर प्रेम करतो”, असे लिहिले आहे.

हेही वाचा: “बिग बॉस ७० दिवसांतच गुंडाळणार…”, तृप्ती देसाईंचा पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना सवाल; म्हणाल्या…

दरम्यान, उत्कर्ष शिंदे सातत्याने चर्चेत असतो. बिग बॉस मराठी ५ व्या पर्वातील स्पर्धकांच्या खेळावर तो व्यक्त होताना दिसतो. जे स्पर्धक चुकीचे वागतात, त्यांच्याबाबत तो खरमरीत शब्दांत पोस्टदेखील शेअर करीत असतो. त्यामुळे त्याची चर्चा होताना दिसते. तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. फायनलला पोहोचत त्याने प्रेक्षकांची मने जिंकल्याचेही पाहायला मिळाले होते. त्याला त्याच्या पर्वातील मास्टर माईंड म्हणून ओळखले जाते. गायनाबरोबरच तो त्याच्या अभिनयासाठीदेखील ओळखला जातो.

Story img Loader