प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रचंड गाजले. आता ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित आहे. या चित्रपटात ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील एक अभिनेता झळकणार आहे. नुकतंच त्याचे एक पोस्टर समोर आले आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा केली. सुभेदार असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

या पोस्टरवर अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार पाहायला मिळत आहेत. या तिघांच्याही डोळ्यात करारी बाणा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिजीतचा पहिला लूक समोर आला आहे. यात अभिजीतने गुलाबी रंगाचा फेटा बांधल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच त्याने पांढरा कुर्ता घातला असून त्यावर रक्त लागल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

अभिजीत श्वेतचंद्रचा हा लूक पाहून अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकरने कमेंट केली आहे. सोहमने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने पोस्टर शेअर केले आहे. “अभिजीत श्वेतचंद्र भावा, खूप प्रेम”, अशी कमेंट सोहमने केली आहे. त्याबरोबरच त्याने तीन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

soham bandekar
सोहम बांदेकरची कमेंट

आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार? नाव आलं समोर

दरम्यान अभिजीत श्वेतचंद्र हा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत झळकला होता. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिजीतने पोलिस इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड ही भूमिका साकारली होती. अभिजीतने ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

Story img Loader