सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २'(Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट २० सप्टेंबर २०२४ ला प्रदर्शित झाला होता. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांच्याबरोबरच स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, निर्मिती सावंत, विजय पाटकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. आता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तीदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट

श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “आजचा दिवस खास कारण-आज ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटसृष्टीत ६१ वर्षे काम करत असताना माझ्या वडिलांनी दिग्दर्शन केलेला हा २१ वा चित्रपट आहे. हे कल्पनेतसुद्धा अद्भूत आहे. यावेळी त्यांनी चित्रपट डिस्ट्रिब्यूट करण्याच्या निर्णय घेतला होता. सगळ्या संकटांनंतरही त्याच आवडीने, निर्धाराने, विश्वासाने काम करताना पाहणे हे प्रेरणादायी होते.”

Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Sachin Pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 release on amazon prime
५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…
इन्स्टाग्राम

“चित्रपट बनत असताना मला पापाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि वितरण देखील हाताळणे, हे सोपे नाही. तो खरोखरच वन-मॅन आर्मी आहे. खूप तणावपूर्ण दिवसांतही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे. तो नेहमी म्हणायचा, “मला प्रत्येक गोष्ट आवडते. मला चांगले आव्हान आवडते”

“त्याचे पडद्यामागून निरीक्षण करून मी खूप काही शिकले आहे. मला साहजिकच या सिक्वेलचा भाग व्हायचं होतं. त्यामुळे चित्रपटातील गणपतीच्या गाण्यातही कॅमिओ केला आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दलदेखील आभार! गणपती बाप्पा आणि तुमच्या आशीर्वादाने हे घडू शकले आहे.”

हेही वाचा: मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…

“पापा, तुम्ही इंडस्ट्रीत ६१ वर्षे काम करत असलात तरी माझ्यावर विश्वास ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहे. रॉकस्टार मला तुझा गर्व वाटत आहे. गणपती बाप्पा मोरया.”

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader