‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री हेमल इंगळे व स्वप्नील जोशी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत हेमल इंगळेने कोकण माझ्यासाठी स्पेशल असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री हेमल इंगळेने नुकतीच ‘प्लॅनेट मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला प्रश्न विचारला की, चित्रपटात कोकण प्रवास दाखवला आहे. तुझ्या काही आठवणी आहेत का प्रवासादरम्यानच्या? यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “कोकण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. देवाच्या कृपेनं कसं काय ते मला माहीत नाही; पण जेव्हापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आली आहे. तेव्हापासून एक फिल्म कोकणात होते. त्यामुळे मला कोकण आणखी जास्त अनुभवता आला; जे कदाचित लहानपणी राहून गेलेलं. लहानपणी रत्नागिरीपर्यंत मी गेले होते.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

“गणपतीपुळे, कुडाळ, रत्नागिरी आणि त्यापुढे गुहागर वगैरे या जागा मी पाहिल्याच नव्हत्या. कारण- कोल्हापूरहून ते जरा जास्त लांब आहे. पण, आता चित्रपटांमुळे मी गुहागर, दापोली ही ठिकाणं पाहिली आहेत. ते पाहिल्यानंतर जाणवतं की, कोकणाचा पट्टा इतका मोठा आहे की, जिथे जास्त गर्दी नसते आणि तो परिसर तसाच राहावा. जेव्हा शहरातल्या गर्दीतून आपण तिथे जातो आणि आपल्याला मोकळा श्वास घेता येतो, तो तसाच राहू दे, अशी माझी इच्छा आहे. पण, कोकण हे शब्दांच्या पलीकडे सुंदर आहे”, अशा शब्दांत हेमलने कोकणाचे वर्णन केले आहे.

स्वप्नील जोशी कोकणाबद्दल बोलताना म्हणाला, “जर आपण कोकण फिरलो, तर त्यापुढे मालदीव, मॉरिशस फिके पडतात. महाराष्ट्राबाहेर आपण कोकणाचं चांगलं मार्केटिंग केलं, तर कोकणात गर्दी होईल. कोकणाचं सौंदर्य, खाद्यसंस्कृती, तिथली माणसं, जागा सर्वच उत्तम आहे. ज्या ठिकाणांवर आजवर कोणीही गेलं नाही अशा जागा कोकणात आहेत. महत्त्वाचं म्हणजे तेथे परवडणाऱ्या जागा आहेत. कारण- मालदीव आणि मॉरिशस म्हणजे खिशाला मोठा फटका आहे. कोकण चार-पाच तासांवर कोकण आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे आहेत. अनेक विमानतळ बनत आहेत. मला असं मनापासून वाटतं की, कोकण खूप जास्त एक्सप्लोर व्हायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की, भारतातील टॉप हॉलिडे डेस्टिनेशन होण्याची ताकद कोकणामध्ये आहे.

हेही वाचा: ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader