Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसऱ्या भागाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला ७.८ कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे अशी जबरदस्त स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ने ( Navra Maza Navsacha 2 ) आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरीही, चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांना चित्रपट आवडलं नसल्याचं बोललं जात आहे. याबाबत एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
हेही वाचा : “त्यांच्या वयाचा तरी विचार कर…”, वर्षा अन् अंकिताची खेचाखेची पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; तर निक्की म्हणाली, “किती घाणेरडा गेम…”
मराठी अभिनेत्याने मांडलं मत
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ध्रुव दातारने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी व व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. सुरुवातीला चित्रपटात पाहतानाची एक स्टोरी टाकून ध्रुवने त्यावर “खरंच खूप वाईट चित्रपट आहे” असं लिहिलं होतं. यानंतर अभिनेत्याला अनेकांनी मेसेज करून “तू मराठी कलाकार आहेस अशा स्टोरी टाकू नकोस” असा सल्ला दिला. मात्र, यावर त्याने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
ध्रुव सांगतो, “‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी टाकली होती. त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं. त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की, तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजेस. अरे पण, मी का बोलू नये? मी फक्त माझं मत मांडलं. मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही. मी चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असता, तर मी नक्कीच कौतुक केलं असतं. पण, तो चित्रपट खरंच खूप वाईट आहे.”
हेही वाचा : “एकीकडे म्हणते सूरजला घर बांधून देणार अन् दुसरीकडे…”, अंकिताच्या ‘त्या’ कृतीवर घन:श्याम नाराज; म्हणाला…
“मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का? सॉरी पण, मी असं करू शकत नाही. सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा प्रश्नच नाहीये. ते छानच आहेत पण, मला स्टोरीलाइन अजिबात आवडली नाही.” असं मत अभिनेत्याने ( Navra Maza Navsacha 2 ) मांडलं आहे.