Navra Maza Navsacha 2 : सचिन पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगांवकर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दल घोषणा केली होती. या चित्रपटाचे संवाद, गाणी सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. येत्या २० सप्टेंबरला ‘नवरा माझा नवसाचा २’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामुळे आता नव्या चित्रपटात कोणती गाणी ऐकायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा आता संपली असून, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. “डम डम डम डम डमरू वाजे…” असे या गाण्याचे बोल आहेत.

हेही वाचा : “साऊथचे कलाकार शिस्तप्रिय अन्…”, तेजस्विनी पंडितने सांगितला अनुभव; दाक्षिणात्य चित्रपटातील जबरदस्त लूक आला समोर

‘नवरा माझा नवसाचा २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

“डम डम डम डम डमरू वाजे…” या गाण्यात सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांना या गाण्यात स्वप्नील जोशी व हेमल इंगळे यांनी देखील साथ दिलेली आहे. हे गाणं स्वत: सचिन पिळगांवकर आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी गायलं आहे.

( Navra Maza Navsacha 2 ) फोटो सौजन्य : सचिन पिळगांवकर

‘नवरा माझा नवसाचा २’मधील ( Navra Maza Navsacha 2 ) पहिल्याच गाण्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे गाणं आणि चित्रपट सुपरहिट होणार”, “मराठी इंडस्ट्रीचे जुने दिवस परत आले”, “गाणं एक नंबर झालंय”, “खरंच खूप खूप सुंदर अभिनंदन टीम!”, “गणपती बाप्पा मोरया” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या गाण्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’च्या प्रतिमाची नव्या मालिकेत एन्ट्री! रुबाबदार अंदाजात साकारणार ‘ही’ भूमिका, पाहा प्रोमो

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट सिनेमात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navra maza navsacha 2 movie first song released netizens praises the team sva 00