Navra Maza Navsacha 2 Marathi Movie Trailer : एसटी बस, गणपती पुळेचा प्रवास, बाबू कालिया ही तीन नावं घेतली तरी डोळ्यासमोर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचं नाव येतं. सचिन पिळगांवकरांचा २००४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. या चित्रपटातील संवाद यामधील गाणी विशेष लक्ष वेधून घेतात. आता या सदबहार चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

तब्बल २० वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पहिलं पोस्टर, पहिलं गाणं, टीझर यानंतर आता नुकताच ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदा सचिन पिळगांवकर म्हणजेच वॅकी आणि त्याचे कुटुंबीय एसटीचा नव्हे तर कोकण रेल्वेचा प्रवास करणार आहेत.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

हेही वाचा : Quiz : छोट्या पडद्यावर वादग्रस्त ठरणाऱ्या Bigg Boss Marathi शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी

‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच अभिनेत्री हेमल इंगळे गणपती बाप्पाला कौल लावत असल्याचा प्रसंग पाहायला मिळतो. यानंतर वॅकी आणि त्याचे कुटुंबीय हा नवस कसा फेडणार? याची मनोरंजक कहाणी सुरू होते. पहिल्या भागात बाबू कालिया ८० कोटींचे हिरे घेऊन पळाला होता. मात्र, या भागात हिऱ्यांची किंमत दुपटीने वाढलेली दाखवण्यात आली आहे. ८०० कोटींच्या हिऱ्यांचा आणि नवसाचा नेमका संबंध काय आहे? वॅकी आणि त्याचे कुटुंबीय यावेळी एसटी सोडून कोकण रेल्वेने गणपती पुळ्याला का निघालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २० सप्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत.

हेही वाचा : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! टीव्हीवर एकदाही न दाखवलेला रितेश-जिनिलीयाचा चित्रपट तब्बल २१ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

Navra Maza Navsacha 2
नवरा माझा नवसाचा २ ( Navra Maza Navsacha 2 )

‘नवरा माझा नवसाचा २’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader