Navra Maza Navsacha Marathi Movie Quiz : सचिन पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये नायकाच्या वडिलांनी बाप्पाकडे नवस केलेला असतो. हा नवस फेडताना नायकाची कशी तारांबळ उडते अन् त्यानंतर गणपती बाप्पा त्याच्याकडून कसा नवस फेडून घेतो, यादरम्यान होणारी खलनायकाची एन्ट्री या सगळ्या गोष्टी रंजक पद्धतीने पाहायला मिळतात. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी असून काही कलाकारांचे कॅमिओ देखील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासंदर्भातील क्विझ

आज २० वर्षांनंतरही ‘नवरा माझा नवसाचा’ ( Navra Maza Navsacha ) या चित्रपटाबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत. या चित्रपटाचे तुम्ही देखील दर्दी चाहते असाल तर क्विझ खास तुमच्यासाठी आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटासंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहे. या १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navra maza navsacha marathi movie quiz sva 00