Navra Maza Navsacha 2 : मराठी कलाविश्वातील ९० च्या दशकातील एव्हरग्रीन चित्रपट चाहत्यांच्या मनात कायम घर करून आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ते ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अशातच ‘नवरा माझा नवसाचा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी घोषणा अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकरांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी केली.

सचिन पिळगांवकरांच्या घोषणेनंतर सर्वत्र ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची चर्चा रंगली असून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाविषयी प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी सध्या नेटकरी सुद्धा उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. २००४ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली. आता तब्बल १९ वर्षांनी सचिन पिळगांवकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष

हेही वाचा : राम चरणच्या बहिणीच्या पहिल्या पतीचं निधन, चिरंजीवी यांच्या लेकीने १९ व्या वर्षी पळून जाऊन केलं होतं लग्न

पहिल्या चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. परंतु, त्याच्याबरोबर कोणती अभिनेत्री झळकणार माहितीये का? नुकताच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या डबिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री हेमल इंगळे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्टुडिओमधील डबिंगचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून आता चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल असा अंदाज नेटकरी बांधत आहे. हेमलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : फराह खान मंचावर येताच मराठमोळ्या गौरव मोरेने केलं असं काही…; दिग्दर्शिकेला हसू आवरेना, पाहा व्हिडीओ

“चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहतोय”, “लवकर प्रदर्शित करा…प्रचंड उत्सुकता आहे” अशा असंख्य कमेंट्स हेमलच्या या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही युजर्सनी कमेंट्समध्ये चित्रपटातील आयकॉनिक संवाद लिहिले आहेत. “जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रपटातील कॉमेडी सीन्स पाहून मनमोकळेपणाने हसत असता…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सचिन पिळगांवकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.

Story img Loader