अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अमोल कोल्हेंनी शनिवारी(२२ एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करणाऱ्या एका चाहतीला त्यांनी रिप्लाय दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कोल्हेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “वर्तमानपत्रात आलेल्या ज्वेलर्सच्या जाहिरातींच्या महापुरातून “खिशा”ची नौका सुखरुप पार करू पाहणाऱ्या बंधूंना आणि जाहिरातीतील दागिना आपल्या गळ्यात असण्याची मनीषा बाळगून भावोजींना गाळात घालण्याची स्वप्न पाहणाऱ्या भगिनींना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा,” असं म्हटलं होतं.

हेही वाचा>> मर्सिडीज बेंझ, आठ कोटींचं आलिशान घर अन्…; अरिजित सिंहची एकूण संपत्ती माहिती आहे का? एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ मानधन

अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली होती. “शुभेच्छा द्या टोमणे नको…अक्षय्य तृतीया का साजरी करतात? किंवा अक्षय्य तृतीया नेमकी काय आहे, हे सांगितलं असतं, तर जास्त छान वाटलं असतं…अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फक्त सोनचं घेतात का? असो…जसे ज्यांचे विचार,” अशी कमेंट चाहतीने केली होती. अमोल कोल्हेंनी चाहतीच्या या कमेंटवर रिप्लाय केला आहे.

हेही वाचा>> ७ कोटींचे दोन फ्लॅट बहिणीला गिफ्ट केल्यानंतर आलिया भट्टने स्वत:साठी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत जाणून अवाक् व्हाल

“तुम्ही सांगा…प्रत्येक वेळी ओढल्या चेहऱ्याने आयुष्याला सामोरे जाण्याची गरज नसते…कधी हलकं फुलकं जगावं…बरं यात सण सणाच्या जागी…मी जाहिरातीमुळे होणाऱ्या परिणामाविषयी टिप्पणी केली. ता. क.- तुमचे ज्वेलरी शॉप असेल तर क्षमस्व!” असा रिप्लाय अमोल कोल्हेंनी दिला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp amol kolhe reply to fan on his post comment goes viral kak