राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीचे सर्वेक्षण केले जात आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन जातीय आधारित माहिती गोळा करत आहेत. पण अभिनेत्री केतकी चितळे व मराठी अभिनेता पुष्कर जोग यांनी यांसदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या घरी बीएमसीमधील महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्या होत्या. या दोघांनी त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. यावरून आता राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोघांवरही टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत जगताप यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी दोघांच्याही आडनावासह नाव घेत उल्लेख केला आहे. “चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी… आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हे हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाने येताय. म्हणून शहाणपणा शिकवायचा असेल तर तो शिंदेंना शिकवा आणि कानाखाली मारायची असेल तर….”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले, “नेत्यांचे पाय चाटणारी जमात…”

काय म्हणाली होती केतकी चितळे?

या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान,” असं केतकी व्हिडीओ शेअर करत म्हणाली होती.

“…तर २ लाथा मारल्या असत्या”, BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यानंतर पुष्कर जोगची संतप्त पोस्ट; म्हणाला…

पुष्कर जोगची पोस्ट काय?

“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”, अशी पोस्ट पुष्करने केली होती.

पुष्कर जोगची पोस्ट

दरम्यान, पुष्कर जोगच्या या पोस्टनंतर त्याच्यावर किरण मानेंनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. “मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात राहा,” अशी पोस्ट त्यांनी केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader prashant jagtap slams pushkar jog ketaki chitale over bmc employee caste survey posts hrc