‘सिंहासन’ हा ७०च्या दशकातील गाजलेला मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ४४ वर्ष पू्र्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, मोहन आगाशे, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात सिंहासन चित्रपटाचे अनेक किस्से शेअर करण्यात आले.

‘सिंहासन’ हा ७०च्या दशकातील सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता. जवळपास ४५ आठवडे हा चित्रपट सिनेमागृहांत ठाण मांडून बसला होता. राजकीय विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला शरद पवारांनी हजेरी लावली होती. तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जब्बार पटेल यांनी सिंहासन चित्रपटाच्या प्रिमियर शोचा एक किस्सा कार्यक्रमात सांगितला.

Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

जब्बार पटेल म्हणाले, “सिंहासनाला एक वेगळा राजकीय रंग आहे. तेव्हा जनता पक्षाचा कार्यकाळ संपत आलं होतं आणि निवडणुका जाहीर होणार होत्या. त्याआधी हा चित्रपट सेन्सॉर करुन घेण्यासाठी सगळे माझ्या मागे लागले होते. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला १० एडिटिंग रुम दिल्या. एका दिवसात चित्रपटाचं एडिटिंग पूर्ण करुन सेन्सॉरशिप मिळवली. पण माझ्या वकील मित्राने सांगितलं की चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे. पण माझा चित्रपट पूर्ण रेकॉर्डचं झाला नव्हता. हिंदमाता चित्रपटगृहाचे मालक माझे मित्र होते. त्यांना मी चित्रपटाचा एक शो लावण्यासाठी आग्रह केला.”

हेही वाचा >> ‘सिंहासन’, शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण! ४४ वर्षांपूर्वीचा कारमधला ‘तो’ प्रसंग; जब्बार पटेलांनी सांगितली आठवण

“सिंहासन राजकीय चित्रपट असल्यामुळे यातून पैसे कसे मिळवणार याची चिंता सगळ्यांना सतावत होती. एक दिवस व्ही शांताराम यांनी मला बोलावलं. छान चित्रपट बनवला आहेस, आता लवकर सिनेमागृहात लाव, असं ते मला म्हणाले. चित्रपटगृहांना स्क्रीन मिळत नसल्याचं मी त्यांना बोलून दाखवलं. त्यावर त्यांनी मला डेक्कन जिमखान्याजवळील डेक्कन सिनेमागृहाबद्दल सांगितलं. त्यानंतर माझ्या एका सिंधी मित्राच्या मदतीने सिंहासन चित्रपटट त्या सिनेमागृहात दाखवला गेला,” असंही पुढे ते म्हणाले.

हेही वाचा>> “अपघातात त्यांचं निधन झालं आणि…” नाना पाटेकरांनी सांगितला ‘सिंहासन’ दरम्यानचा ‘तो’ वाईट प्रसंग, म्हणाले, “चित्रपटात मी त्यांना मारलं म्हणून…”

शरद पवारांचा किस्सा सांगताना जब्बार पटेल म्हणाले, “मी पहिल्या दिवशी सिनेमागृहात गेलो. चित्रपटगृहाच्या मालकाने मला सिंहासन चित्रपटाचं आठवडाभरासाठी अँडव्हान्स बुकिंग झाल्याचं सांगितलं. पहिल्या शोला कोण येणार असं मी त्याला विचारलं. त्यावर तो उत्तर देत मुख्यमंत्री येणार आहेत, असं म्हणाला. सिंहासनच्या प्रिमियर शोसाठी शरद पवार आले आणि त्यानंतर जवळ जवळ ४४ आठवडे चित्रपट चालला. त्या सिनेमाला काहीही त्रास झाला नाही.”

Story img Loader