मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल कोल्हे यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुखापत झाली आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाच्या कराडमधील प्रयोगादरम्यान कोल्हेंना ही दुखापत झाली आहे. अमोल कोल्हेंनी व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली असून त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना अमोल कोल्हेंना दुखापत झाली. घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला गेल्याने कोल्हेंच्या पाठीत कळ आली. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना लगेचच घोड्यावरुन उतरविण्यात आले. अशा परिस्थितीतही अमोल कोल्हेंनी प्राथमिक उपचार व औषधे घेऊन प्रयोग सुरूच ठेवला. प्रयोग संपल्यानंतर कोल्हेंनी प्रेक्षकांना त्यांच्या दुखापतीबाबत सांगितलं.

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

हेही वाचा>> शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, प्रतिक्रिया देत म्हणाले, “अंकुश चौधरी…”

अमोल कोल्हेंना दुखापत झाल्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाचे कराडमधील पुढचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. या नाटकाचा १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेला प्रयोग हा कराडमधील शेवटचा प्रयोग असेल, अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली आहे. दुखापतीवर योग्य ते उपचार घेऊन ११ मेपासून पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा प्रयोग सादर केले जातील, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

हेही वाचा>> ‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आकाश ठोसर पोस्ट शेअर करत म्हणाला…

अमोल कोल्हेंनी विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अमोल कोल्हेंच्या या ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकालाही प्रेक्षक गर्दी करत होते.

Story img Loader