अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सध्या चर्चेत आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या अमोल कोल्हेंनी अभिनयाची वाट धरली. विविधांगी भूमिका साकारून अमोल कोल्हेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली.
अभिनयात ठसा उमटवल्यानंतर अमोल कोल्हे राजकारणात सक्रिय झाले. आता ते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार आहेत. अमोल कोल्हेंनी नुकतीच ‘लोकमत’च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखतही घेतली.
हेही वाचा>> रितेश देशमुखने भर कार्यक्रमात मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाला, “तुम्ही महाराष्ट्रासाठी…”
राज ठाकरेंनी या कार्यक्रमात कुटुंबियांसह हजेरी लावली होती. राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. या कार्यक्रमातील अमित ठाकरेंबरोबरचा एक फोटो अमोल कोल्हेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अमोल कोल्हेंनी अमित ठाकरेंबरोबरच्या या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमित ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी पोस्ट लिहिली आहे. “जमिनीवर पाय असलेल्या अमित ठाकरेंना भेटून आनंद झाला,” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. अमोल कोल्हेंची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.