खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमोल कोल्हे काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप-गरुडझेप’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. हा चित्रपपट छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेली सुटका यावर आधारित होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले. मात्र नुकतंच अमोल कोल्हे यांनी एक कटू अनुभव सांगितला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी एका दिग्गज रंगकर्मीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता, अशी आठवण सांगितली.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

“मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या खाली मी एका अत्यंत दिग्गज नाट्यकर्मींना मी भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, कृपया महाराजांची भूमिका करु नका, कारण ती कधीच फळत नाही.

जेव्हा मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा मी जेमतेम २८ वर्षांचा होतो. त्यावेळी एकच विचार होता की २८ व्या वर्षी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून दख्खनच्या पठारावर स्वत:ची द्वाही फिरवली. आपल्याला २८ व्या वर्षी संधी मिळतेय, तर चान्स घ्यायला काय हरकत आहे”, असे अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “माझे वडील…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘वीर शिवाजी’ या मालिकेतही त्यांनी महाराजांची भूमिका साकारली होती.

तसेच ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय ‘राजमाता जिजाऊ’, ‘रमा माधव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ यासारख्या चित्रपटांतही त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

Story img Loader