बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्यावरील या बायोपिकमध्ये त्यांच्या जीवनाचे व व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दाखविण्यात आले आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असून त्याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्नीसह रविवारी(३० एप्रिल) ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार व त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा>> शाहीर साबळेंच्या पत्नींबरोबर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली, “मी…”

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांनी अंकुश चौधरीचंही कौतुक केलं. “शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले,” असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा>> Video : “अर्ध आयुष्य संपलं, पण…” सहा बहिणींची अनोखी गोष्ट, केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

केदार शिंदेंची लेक सना शिंदेने ‘महाराष्ट्र शाहीर’मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनाने या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे व निर्मिती सावंत यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar watched marathi movie maharashtra shahir praises ankush chaudhari kak