अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकामुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांचं हे नाटक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. काही दिवसांपूर्वी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हेंना दुखापत झाली होती. उपचारानंतर कोल्हेंच्या नाटकाचे प्रयोग आता पुन्हा सुरू झाले आहेत. अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाला खासदार सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमोल कोल्हेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे नाटकाचा आनंद घेताना दिसत आहेत. प्रयोग सुरू असताना सुप्रिया सुळे मोबाईलमध्ये शूटिंग करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अमोल कोल्हेंच्या घोड्यावरुन एन्ट्री घेतानाचा क्षण सुप्रिया सुळेंनी कॅमेऱ्यात कैद केल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “आर्यनपेक्षा शाहरुख खान…” भर कार्यक्रमात विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर गौरी खानचे थेट उत्तर

“पिंपरी चिंचवड येथील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या आजच्या प्रयोगास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गदर्शक खासदार सुप्रियाताई सुळे यांची सन्माननीय उपस्थिती! खूप खूप धन्यवाद सुप्रिया सुळे ताई”, असं कॅप्शन अमोल कोल्हेंनी या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> छोटा राजनशी संपर्क, पत्रकाराची हत्या; कोण आहे जिग्ना वोरा? जिच्यावर हंसल मेहतांची ‘स्कूप’ सीरिज बेतलेली आहे

अमोल कोल्हेंचं ‘शिवपुत्र संभाजी’ नाटक पाहिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. प्रयोगादरम्यानचा व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “‘शिवपुत्र संभाजी ‘ महानाट्य…नक्की पहा!” असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.