सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजेरकरने काही दिवसांपूर्वी नव्या क्षेत्रात पदार्पण केले. सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्याच्या या व्यवसायाचे सध्या अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सत्य मांजरेकरच्या हॉटेलमधून चमचमीत जेवण ऑर्डर केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलमधून नीना कुळकर्णी यांनी काही पदार्थ ऑर्डर केले आहे. त्याबद्दल त्यांनी पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “हे स्वप्न…” सत्या मांजरेकरच्या नव्या हॉटेलमागची कल्पना नेमकी कोणाची? नाव आलं समोर

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
A Punekar young guy lost iPhone in PMT bus
Video : पीएमटी बसमधून प्रवास करताना तरुणाचा आयफोन गेला चोरीला, पुणेकरांनो, काळजी घ्या; व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओत नीना कुळकर्णी या जेवणाचे पार्सल उघडताना दिसत आहेत. त्यांनी सुकी करंदी, काळं चिकन, सोलकढी असे अस्सल मालवणी पदार्थ ऑर्डर केले होते. त्यांची नीना कुळकर्णींनी चव चाखली आहे.

“माझा रविवार पूर्णपणे सार्थकी लागला. मी सुका सुखी मधून हे जेवण ऑर्डर केलं आहे. त्यांच्याकडे तुम्हाला विविध शाकाहारी आणि मालवणी पदार्थांची चव चाखता येईल. सत्या मांजरेकर तुला खूप खूप शुभेच्छा. आता मी बोलणं थांबवणार आहे आणि खायला सुरुवात करणार आहे. ‘सुका सुखी’लाही शुभेच्छा”, असेही नीना कुळकर्णी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान नीना कुळकर्णींनी केलेल्या या पोस्टवर सत्या मांजरेकरने प्रतिक्रिया दिली आहे. सत्या मांजरेकरने ‘धन्यवाद नीना काकू’, असे त्याने म्हटले आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलमध्ये अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चवही तुम्हाला इथे चाखता येणार आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर येताना दिसत आहेत.

Story img Loader