सध्या चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘गालिब’ हे नाटक रंगभूमी गाजवतं आहे. ‘गालिब’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या या नाटकाला अनेक पारितोषिक मिळत आहेत. नुकतंच त्याचा ‘गालिब’ नाटकासाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने काल, २४ एप्रिलला प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मानाचा लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. तसंच अशोक सराफांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आलं. याच वेळी अभिनेता चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचविषयी चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात चिन्मय मांडलेकरचा गौरव, अभिनेता आभार मानत म्हणाला, “DNAमध्ये फक्त तीनच नाव…”

चिन्मयला पुरस्कार प्रदान करतानाचा व्हिडीओ शेअर करत नेहाने लिहिलं आहे, “तू माझा नवरा आहेस याचा फक्त आणि फक्त अभिमान आहे. तुझ्यासारखा तूच चिन्मय. इतकं विनय, इतकी विनम्रता. हे सगळं तूच करू जाणे…”

पुढे नेहाने लिहिलं, “मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान – सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा बहु सन्माननीय श्री मोहन वाघ पुरस्कार आज ‘गालिब’ नाटकला दिला गेला…नाटकाच्या टीमचे अभिनंदन. हा पुरस्कार विशेष आहे. कारण मंगेशकरच्या आडनावाने मिळालेला कोणताही पुरस्कार खास असतो. दिवंगत मोहन वाघ पुरस्कार चिन्मयने स्वीकारला. अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिन्मय तुझा खूप खूप अभिमान वाटतो.”

हेही वाचा – Video: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीची ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

दरम्यान, सध्या चिन्मय मांडलेकर हे नाव खूप चर्चेत आहे. कारण आहे त्याच्या मुलाचं नाव. चिन्मयने मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. त्याच्या पत्नीला “भारत सोडून जा,” असे मेसेज केले जात आहेत. यावरून काही दिवसांपूर्वी नेहाने व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिनं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha joshi mandlekar shared special post for husband chinmay mandlekar pps