गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठा पडदावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असलं तरीही ते पाहून काही प्रेक्षक निराश झाले आहेत.
गेले अनेक महिने ‘सुभेदार’ची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख तीन-चार वेळा बदलल्यानंतर अखेर हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं. परंतु अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे शो उपलब्ध असल्याचं दिसत नाहीये.
या चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याची माहिती पोस्ट शेअर करत दिली. कलाकारांची पोस्ट पाहून उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी लगेचच बुक माय शोवरून या चित्रपटाची तिकीट काढायला सुरुवात केली. पण अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो उपलब्ध नसल्याचं दिसत आहे. याबाबत एका नेटकऱ्याने चिन्मय मांडलेकरच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, “किती कमी थिएटर्समध्ये होतोय रिलीज! मुंबईमध्ये फक्त गोरेगाव दिसत आहे बुकिंगमध्ये.” त्यावर या चित्रपटातील अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने उत्तर देत लिहिलं, “हळूहळू थिएटर्स वाढणार आहेत. याच आठवड्यात वाढतील.”
दरम्यान, या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, स्मिता शेवाळे, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, असतात काळे असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.