मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सायली तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी क्रिकेटपटु ऋतुराज गायकवाडबरोबर सायलीचं नाव जोडलं गेलं होतं. दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. पण सायलीने या नात्याबाबत स्पष्टीकरण देत अफेअर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा एकदा सायली ऋतुराजमुळे चर्चेत आली आहे.
सध्या आयपीएल २०२३ची जोरदार चर्चा आहे. सोमवारी (३ एप्रिल) चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सवर १२ धावांनी शानदार विजय मिळवला. सीएसके संघाचा ऋतुराज गायकवाड यावेळी अगदी उत्तम खेळला.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
ऋतुराजचा संघ विजयी झाल्यानंतर सायली भलतीच चर्चेत आली आहे. सायलीने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान करत एक फोटो पोस्ट केला. तिला नवा मराठी चित्रपट ‘उर्मी’च्या प्रमोशनसाठी ती खास तयार झाली. पण तिचा पिवळ्या रंगाचा टॉप पाहून नेटकऱ्यांना ऋतुराजची आठवण झाली. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर अगदी गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.

तू सीएसके व ऋतुराजची फॅन आहेस का?, वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून पिवळा ड्रेस घातला का?, ऋतुराजची सायली, ऋतुराजचीच हवा आहे, सायली व ऋतुराजच बेस्ट आहेत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण आता सायली व ऋतुराजमध्ये संवादही होत नाही. याबाबत सायलीनेच एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, “जेव्हा ऋतुराज आणि माझ्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं देखील बोलू शकत नाही. माझं नाव त्याच्याबरोबर जोडलं जातं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती”.