अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावरून त्यांची मतं मांडत असतात. ते ऐतिहासिक व्याख्यानेही देतात. बाजीराव पेशवे यांच्याबद्दल ते अनेकदा व्याख्यानं देत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजा छत्रसाल यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांचं वचन पूर्ण करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी राजा छत्रसाल यांची कशा पद्धतीने मदत केली होती, याबद्दलही सांगितलं. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
काय म्हणाले होते शरद पोंक्षे?
“राजा छत्रसाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मैत्री खूप जुनी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजा छत्रसाल यांना वचन दिलं होतं की ‘तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे, काळजी करू नकोस.’ त्या छत्रसाल राजांनी निरोप पाठवला की ‘मला भीती वाटते, आता मी संपून जाईन.’ नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द बाजीराव पेशव्यांनी पाळला. मध्ये चार पिढ्या गेल्या. एवढ्या पिढ्यांनंतर बाजीराव पेशव्यांनी तो शब्द पाळला आणि छत्रसालांना तिकडे जाऊन वाचवलं. वाचवल्यानंतर दोन तृतीयांश प्रदेश आणि तिथली ९ गावं त्यांना भेट म्हणून मिळाली. हे त्या प्रदेशाचे राजा होऊ शकले असते. पण नाही. स्वामीनिष्ठा काय असते. ती सगळी ९ गावं, दोन तृतीयांश प्रदेश हारून बाजीराव पेशव्यांनी स्वराज्यामध्ये दिला, छत्रपतींच्या गादीला अर्पण केला. खरं तर तो प्रदेश, ती गावं सहज ते घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं,” असं शरद पोंक्षे या व्हिडीओमध्ये बाजीराव पेशव्यांबद्दल म्हणाले आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अशा रितीने नेटकऱ्यांनी शरद पोंक्षे यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.