अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तसंच प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितीज दाते, हृषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, दीप्ती लेले, सुनिल अभ्यंकर, निखिल राऊत असे अनेक तगडे कलाकार मंडळी ‘फुलवंती’ चित्रपटात झळकले आहेत. प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच चित्रपटानिमित्ताने प्राजक्ता माळी विविध ठिकाणी मुलाखती देताना पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ऑरा जपण्यासाठी काय करते? याविषयी सांगितलं होतं. त्यावरून नेटकरी प्राजक्ता माळीला ट्रोल करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी प्राजक्ताने ऑरा जपण्यासाठी ती काय करते? याबाबत सांगितलं. प्राजक्ता म्हणाली, “मी नेहमी बाहेरून खूप माणसांमधून घरी गेले तर मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करते. सातत्याने थोडे थोडे केस कापत राहते. कारण तुमची सर्वात जास्त मेमरी हाडं आणि केसांमध्ये असते. आर्ट ऑफ लिव्हिंगमुळेच मला हे कळलंय की, जेव्हा तुमची उजव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा जेवा. जेव्हा डाव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा ध्यानाला बसा, पाणी प्या. मला या छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप फायदा होतो. त्यामुळे लोकांमध्ये बाहेर फिरताना पोट बिघडत नाही.”

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…

पुढे प्राजक्ता माळी म्हणाली की, एकावेळेला तुम्ही चारच पदार्थ खा. म्हणजे पोटात मारामारी होतं नाही. चार पेक्षा अधिक पदार्थ असेल तर मग गडबड होते. यामुळे मी कितीही प्रवास केला तर माझी सिस्टिम जाग राहायला मदत होते. ते शिकल्यामुळे बाहेर वावरताना त्रास होतो. पण ते शिकल्यामुळे असं वावरणं सुसह्य देखील होतं. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

नेटकरी काय म्हणाले?

“किती ते ओव्हर करायचं सगळं? फालतूपणा”, “शेतकरी हे सर्व करू शकतो?”, “भर्मिष्ट”, “अती शहाणी”, “स्वतःला मिस वर्ल्ड समजते का गं?”, “ओव्हर अ‍ॅक्टिंगचं दुकान”, “बसं झालं जास्त नको शिकवू”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मेमरी हाडं आणि केसांमध्ये असते हे मला २५ वर्ष सायन्स शिकल्यावर आज समजलं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, गावात राहणारा माणूस १०० वर्ष जगला, त्याला हे माहीत असतं तर अजून ५० वर्ष जगला असता.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा.” चौथा नेटकरी म्हणाला, “फरसाण खायचं बंद कर”

Comments
Comments

हेही वाचा – “नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाला, “आजूबाजूच्या गोंगाटात…”

Comments
Comments

दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी आता निर्माती सुद्धा झाली आहे. ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, “‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या बरोबर आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.”