आज सगळीकडे महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित असेल. आजच्या या खास दिनी या चित्रपटाचं पहिलं पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
आज याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे. सुनील शेळके ‘संयुक्त महाराष्ट्र’ चित्रपटाचे निर्माते आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोणते कलाकार झळकतील हे येत्या काळात कळेल.
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणाले, “ही चळवळ आजवरची संयुक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”