ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची एव्हरग्रीन जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रात काम करून या दोघांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. निवेदिता सराफ सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेने नुकताच ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. याच निमित्ताने या मालिकेतील मुख्य कलाकारांसह निवेदिता यांनी ‘राजश्री मराठी’ला इन्स्टाग्राम लाइव्ह मुलाखत दिली. यावेळी अभिनेता विवेक सांगळेने निवेदिता आणि अशोत सराफ यांच्या समाजकार्याबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली.

हेही वाचा : “घरी गाडी असून ऑडिशनला बसने जायचो, कारण…”, विकी कौशलने केला खुलासा; म्हणाला, “आई-वडिलांनी…”

Bhartiya Janata Yuva Morcha commotion and announcement at Shyam Manavs event
नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि गोंधळ, काय घडले?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Ratan Tata signed letter, Ratan Tata,
रतन टाटा यांच्या स्वहस्ताक्षरातील पत्र व्हायरल….
GN Saibaba, GN Saibaba passes away,
बिनबंदुकीचा नक्षलवादी- नायक की खलनायक?
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता
What Nitin Gadkari Said About Ratan Tata?
Ratan Tata Death : “देशाने दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला”, रतन टाटांच्या निधनानंतर नितीन गडकरींची पोस्ट
Nitin Gadkari, patodi, Nagpur, patodi sellers,
गडकरींचे खाद्य प्रेम अन् पाटोडी विक्रेत्यांची सोय
women employees ratio in indian companies reached 36 6 percent in current year
विश्लेषण : भारतीय महिलांचा टक्का वाढतोय ?

अभिनेता विवेक सांगळे निवेदिता आणि अशोक सराफ यांचे कौतुक करत म्हणाला, “आता फार जास्त लोकांना याबद्दल कल्पना नसेल पण, निवेदिता मॅडम आणि अशोक सराफ सर यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा एक नवा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ, ज्यांच्या घरी खरंच पैशांची आवश्यकता आहे किंवा वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे.”

हेही वाचा : “ना धूम्रपान, ना बॉयफ्रेंड…”, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेआधी मानुषी छिल्लरने बनवले होते ‘हे’ नियम, खुलासा करत म्हणाली…

विवेक पुढे म्हणाला, “उपक्रमाअंतर्गत गरजू लोकांचा वैद्यकीय खर्चदेखील करण्यात येणार आहे. सध्या त्यांनी पहिल्या टप्प्यात काही लोकांची निवड केली आहे. भविष्यात याची व्याप्ती आणखी वाढेल. हे दोघेही एक कलाकार म्हणून मोठे आहेतच पण, एवढे मोठे कलाकार होऊनही त्यांनी त्यांचे सामाजिक भान जपले आहे. याचा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात येत्या २९ तारखेला संपन्न होणार आहे.”

हेही वाचा : “१० वर्षांच्या मुलीसह १० मिनिटांत बाहेर…”, ‘बार्बी’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर जुही परमार संतापली; नेमकं काय घडलं?

“माझ्यासारख्या नव्या कलाकारांनी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. विशेषत: आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.” असे सांगत विवेकने निवेदिता आणि अशोक सराफ यांचे हा उपक्रम सुरु केल्याबद्दल आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, “आताच हा उपक्रम सुरु केला आहे आणि भविष्यात मोठ्या पातळीवर काम करण्याची इच्छा आहे.” असे निवेदिता सराफ म्हणाल्या.