विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडीही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. नुकताच निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्याबाबत एक जुना किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “५२ सर्जरी, माझं कुटुंब उद्धवस्त झालं…” दिल्लीत शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर कंगना रणौतचा धक्कादायक खुलासा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवेदिता यांनी पतीने त्यांना पहिलं गिफ्ट काय दिलं होतं? याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “त्याने मला दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणजे घड्याळ. त्यानंतर माझ्या एका वाढदिवसाला त्याने माझं निवेदिता असं नाव असलेलं सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिलं.”

“हे सगळं मला आजही लक्षात आहे. एक गंमत सांगते. मुंबईमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण मी करत होते. त्याचदरम्यान अशोक सराफही मॉरिशसला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. मॉरिशसला तेव्हा साड्या वगैरे चांगल्या मिळायच्या. मॉरिशसवरुन तेव्हा त्याने मला सात ते आठ साड्या आणल्या.”

आणखी वाचा – “त्याचक्षणी त्या नगरसेवकाच्या तोंडावर…” तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा, भाड्याच्या घरात राहत होती अभिनेत्री

“मीही आनंदी झाले. साड्या अगदी छान आहेत असं मी त्याला म्हटलं. ही आमच्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. मी त्याला विचारलं तू स्वतः जाऊन घेऊन आलास? तेव्हा त्याने मला हो असं उत्तर दिलं. त्यानंतर थोड्यावेळाने लेखक श्रीनिवास भनगे यांची आणि माझी भेट झाली. त्यांनी मला विचारलं निवेदिता तुला साड्या आवडल्या का? मी हो असं म्हटलं. ते म्हणाले तुला विचारलं कारण अशोक मला म्हणाला होता तू बाजारात जात आहेस तर निवेदितासाठी सात ते आठ साड्या घेऊन ये. त्यानंतर त्याचं (अशोक सराफ) भांड फुटलं.” निवेदिता सराफ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita saraf talk about first gift from husband ashok saraf know about couple bonding see details kmd