मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. आपल्या विनोदी भूमिकांमधून तर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं. चाहत्यांना अशोक सराफ यांचं खरं आयुष्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. ते स्वतः सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. पण त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मीडियाद्वारे विविध पोस्ट शेअर करताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आताही निवेदिता यांनी शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. निवेदिता यांनी अशोक यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खास आहे. कारण अशोक यांच्यासह त्यांचा भाऊही या फोटोमध्ये दिसत आहे. निवेदिता यांनी दोन भावांचा फोटो शेअर करत या पोस्टला एक छान कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – अमेरिकेत स्वत:ची कामं स्वत:च करताहेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार, विशाखा सुभेदार म्हणाली, “परदेशात आपल्या माणसांची…”

अशोक सराफ यांचा भाऊ काय करतो?

निवेदिता यांनी म्हटलं, “बेस्ट भाऊ”. अशोक यांच्या सख्ख्या धाकट्या भावाचं नाव सुभाष सराफ असं आहे. आज अशोक व निवेदिता सराफ चित्रपटसृष्टीमधील मोठं नाव आहे. अशोक यांनी अभिनयकौशल्याच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज मराठीतील प्रत्येक कलाकाराला अशोक यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. मात्र अशोक यांच्या भावाने एक वेगळंच क्षेत्र निवडलं.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

सुभाष हे गेल्या ४० वर्षांपासून अधिक काळ सीए म्हणून काम पाहत आहेत. अर्थक्षेत्रामध्ये सुभाष यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोक व सुभाष यांच्यामध्ये अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे. दोन्ही भावांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमामध्येही दोघांनी हजेरी लावली होती. निवेदिता यांनी शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांनी या जोडीला पसंती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita share photo of ashok saraf with his brother subhash says best brothers see details kmd