नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव व मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना वडील-मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट अनुभवता येणार आहे. ‘ओले आले’ चित्रपटाच्या टीमने अलीकडेच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या.
‘ओले आले’ चित्रपटाचं दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटाला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचं संगीत लाभलं आहे. ‘ओले आले’ या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन व जिगर यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.
येत्या ५ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.