‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ओंकार चित्रपटातदेखील काम करतो मात्र त्याची ओळख ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील एका अभिनेता म्हणूनच, याच कार्य्रक्रमातील आणखीन एक अभिनेता म्हणजे गौरव मोरे. या कार्यक्रमात दोघांच्या केमिस्ट्री लोकांना आवडली होती, नुकतंच एका मुलाखतीत ओंकारने यावर भाष्य केलं आहे.
ओंकार त्याच्या ‘सरला एक कोटी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त एका रेडिओ चॅनेलवर गेला होता. त्याच्याबरोबर ईशा केसकरदेखील होती. गौरव बद्दल बोलताना तो असं म्हणाला, “आम्हा दोघांच्या करिअरची सुरवात एकांकिकापासून झाली आहे. गौरव माझा सिनियर, मी एकदा सवाई एकांकिका स्पर्धा बघण्यासाठी गेलो होतो. तिथे गौरवची पद्याआड ही एकांकिका पहिली आणि मी अवाक झालो. दुसऱ्या वर्षी मी गौरवला त्याच नाट्यगृहाबाहेर भेटलो आणि त्याला तुझी ती एकांकिका खूप मस्त होती कधीतरी एकत्र काम करू. त्यावर त्याने ही होकार दिला.”
तो पुढे म्हणाला, “त्याला ही माहित होतं मी एकांकिका स्पर्धा करत होतो. त्यानंतर आम्ही थेट हास्यजत्रेच्या सेटवर भेटलो तेव्हा मी गौरवला त्या दिवसाची आठवण करून दिली. आधीच बोलणं आता कामी आलं, आम्ही कामाशिवाय मित्र नाही पण आम्हाला जे एकमेकांबद्दल वाटत ते आम्ही कामातून दाखवतो.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.