Pachadlela Movie : २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पछाडलेला’ चित्रपट आजही मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटाची आगळीवेगळी पण, थरकाप उडवणारी कथा सगळ्यांसाठी मनोरंजक ठरली. विशेष म्हणजे, यामध्ये भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, विजय चव्हाण, मेघा घाडगे, नीलम शिर्के अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. या चित्रपटाचं कथानक इनामदार वाड्याभोवती फिरतं.

एक पडका वाडा, त्यात राहणारे तीन मित्र, मग त्यातल्या एका मित्राला भूताने झपाटणं असं एकंदर या चित्रपटाचं कथानक होतं. हा चित्रपट २००४ मध्ये सुपरहिट ठरला होता. आजही टीव्हीवर हा चित्रपट लागला की, सगळे तितक्याच आवडीने पाहतात. चित्रपट पाहिल्यावर हा ‘पछाडलेला’ वाडा नेमका कुठे आहे याची उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून याचं उत्तर समोर आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
manmohan mahimkar in financial trouble
ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना; खोली विकण्यासाठी कुटुंबीयांकडून दबाव, आर्थिक संकट अन्…; खंत व्यक्त करत म्हणाले…
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

हेही वाचा : ९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

‘पछाडलेला’ सिनेमातील इनामदारांचा वाडा हा गगनबावडा या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान रामचंद्रपंत अमात्य यांचे नववे वंशज परशुरामपंत अमात्य यांनी १९३३ ते १९३५ या काळात हा वाडा बांधला. वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ २ तोफा आहेत. या वाड्याच्या पहिल्याच खोलीत प्रवेश केल्यावर सर्व इतिहास लिहिण्यात आलेला आहे. याठिकाणी संपूर्ण संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. कोल्हापूरपासून हा वाडा ४६ किलोमीटर अंतरावर आहे. या वाड्याला पंतांचा वाडा म्हणून देखील ओळखलं जातं.

‘पछाडलेला’ या सिनेमामुळे हा वाडा सर्वत्र चर्चेत आला. मात्र, याठिकाणी ‘पाऊस येता येता’, ‘काल रात्री बारा वाजता’, ‘रामचंद्र पंत’, ‘बिनकामाचा नवरा’ या सिनेमांचं, तसेच काही मालिकांचं देखील शूटिंग करण्यात आलं आहे. आज या वाड्याला ८९ वर्षे होऊनही ही वास्तू जशास तशी आहे. या वाड्याचा सध्याचा व्हिडीओ akshayjangam_life या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”

‘पछाडलेला’ वाडा जशास तसा असला तरीही त्यात फक्त एकच वस्तू कमी आहे ती म्हणजे वाड्यावर सिनेमात एक जुनं घड्याळ लावण्यात आलं होतं. नेटकऱ्यांना हा नवा व्हिडीओ पाहून त्या जुन्या घडळ्याची आठवण झाली आहे. ते घड्याळ केवळ शूटिंगसाठी वापरण्यात आलं होतं.

Pachadlela Movie
Pachadlela Movie

“घड्याळ बंद पडलं वाटतं”, “मी पूर्ण व्हिडिओमध्ये घड्याळ शोधत होते.. कुठे गेलं”, “इनामदार कुठे दिसत नाही” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘पछाडलेला’ या एव्हरग्रीन चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केलं होतं.

Story img Loader