‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती – लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. २००१ साली रंगभूमीवर आलेले परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. याच नाटकावर आधारित हा सिनेमा येणार आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, अद्वैत दादरकर आणि गीतांजली कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमाच्या टीमने ‘लाडकी जनता योजना’ आणली आहे.
‘लाडकी जनता योजना’ ही प्रेक्षकांसाठीची योजना आहे. यात प्रेक्षकांना याच चित्रपटातील एका गाण्यावर रील तयार करण्याची संधी मिळणार आहे .त्या रीलचा वापर करून ते रिल्स मोनेटाईज करून व्ह्यूज मिळवू शकणार आहेत.
हेही वाचा…“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”
काय आहे लाडकी जनता योजना ?
‘लाडकी जनता योजनेचं मुख्य वैशिष्ट्य हे या सिनेमातील एक गाणं आहे. या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांसाठी कॉपीराईट मुक्त करण्यात येणार आहे. मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. पोस्ट मध्ये चित्रपटाच्या टीमने लिहिलं, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची ‘ लाडकी जनता योजना !’ आमचे गाणे तुमच्या खात्यावर! आम्ही मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीचे पहिले गाणे खास प्रेक्षकांसाठी COPYRIGHT FREE केले आहे. तुम्ही हे गाणे शेयर करा, गाण्यावर Reels करा, Dance करा आणि Monetize सुद्धा करा…”
हे गाणं कुठे करता येईल डाउनलोड ?
‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाची टीम प्रेक्षकांसाठी हे गाणं उपलब्ध करून देणार आहे. टीमने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती देताना सांगितलं की, “तुम्हाला ह्या नव्याकोऱ्या गाण्याची Downloadable लिंक हवी असल्यास, खालील इ-मेल आयडी वर आम्हाला तुमच्या नाव, मोबाईल नंबर आणि Insta/FB हॅन्डल्स सहित १०.११.२४ पर्यंत मेल करा आणि गाणे तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर अपलोड करा”. bombilwaadisong@gmail.com या इमेल आयडी आपली माहिती इमेल करायची आहे.
हेही वाचा…अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
‘मु.पो. बोंबिलवाडी’ हा सिनेमा १ जानेवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वैभव मांगले, मनमीत पेम, प्रणव रावराणे, गणेश मयेकर, रितिका श्रोत्री, यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहे. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.