गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत विविध धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. पिल्लू बॅचलर असे या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून अभिनेत्री अक्षया देवधर पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिल्लू बॅचलर या चित्रपटात विनोदी आणि एक हलकीफुलकी कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या नावावरुन यात प्रेमकथा पाहायला मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र तरीही ही कथा काय असेल यांचं कुतूहल प्रेक्षकांना आहे.
आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र, नवीन पोस्टर आलं समोर

पिल्लू बॅचलर या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहेत. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा : ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण, प्रसाद ओक पोस्ट करत म्हणाला “आज अखेर…”

तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिले आहेत. या चित्रपटाचे गीतलेखन मंगेश कांगणे यांनी केले आहे. तर चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parth bhalerao akshaya deodhar sayali sanjeev comedy movie pillu bachelor will release after diwali nrp