अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं होतं. चंद्रमुखी चित्रपटाच्या यशानंतर प्रसाद-अमृता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या नव्या चित्रपटात अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहेत.
घटस्थानपनेच्या मुहूर्तावर प्रसादने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.

हेही वाचा : अस्मिता-प्रियाचा नवा डाव, पूर्णा आजीला भडकवणार अन्…, ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागात काय होणार? जाणून घ्या…

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आबा गायकवाड यांनी केलं असून, दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: प्रसाद ओकने सांभाळली आहे. यापूर्वी त्याने ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ अशा अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

हेही वाचा : Video: “जे काय करायचं ते गाडी थांबवून करा…”, ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी घेतली मुग्धा-प्रथमेशची शाळा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर ‘पवळा’च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रसादने नव्या चित्रपटाचं पोस्टर सर्वत्र प्रदर्शित केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रसाद लिहितो, “अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ‘पठ्ठे बापूराव'”

हेही वाचा : Video : “चुकीची कामं केल्यावर…”, पती राज कुंद्राबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले…

नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यावर प्रसाद ओकवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत ‘पठ्ठे बापूराव’ या नावाने प्रसिद्ध झाले. परंतु, त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष प्रसाद ओक त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Story img Loader