‘पावनखिंड’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. तर अंकित मोहन रायाजीराव बांदल यांच्या भूमिकेत होता.
अंकित मोहनच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटामुळे वाढ झाली. सोशल मीडियावरुन अंकित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच अंकितने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला भेट दिली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळचे काही फोटो अंकितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
हेही वाचा>>“तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभं राहून अंकितने मानवंदना दिल्याचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. अंकितने शेअर केलेल्या या पोस्टला त्याने “मुजरा सरकार, सांगा काय करू…तुमचा मावळा”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
हेही वाचा>>“अशोक सराफ आजही…”, निवेदिता यांनी पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
हेही वाचा>>‘अवतार २’ चित्रपटाने १३ दिवसांत जमवला एक बिलियन डॉलरचा गल्ला; देशभरात कमावले ‘इतके’ कोटी
‘पावनखिंड’ हा चित्रपट फेब्रुवारी २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता. याआधी अंकित ‘फत्तेशिकस्त’ व ‘फर्जंद’ या चित्रपटांत ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसला होता. याशिवाय त्याने अनेक मराठी व हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.