‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका साकरणारा अभिनेता हरीश दुधाडे हा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. हरीश दुधाडे याने सध्या त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली आहे. अभिनेता हरीश दुधाडे हा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या पत्नीबरोबरचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरीश दुधाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच हरीशने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे त्याने तो विवाहबंधनात अडकला असल्याची माहिती दिली आहे. यात त्याने त्याच्या पत्नीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

यावेळी हरीशने छान सदरा लेहंगा आणि फेटा असा पारंपारिक लूक केला आहे. तर त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. यात ते दोघेही फारच गोड दिसत आहे. या फोटोला त्याने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने #wedding #weddingday #happilymarried असे हॅशटॅगही शेअर केले आहेत. हरीश दुधाडेच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम असे आहे.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान हरीश दुधाडे हा गेल्या १० ते १२ वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहे. ‘माझे मन तुझे झाले’ मालिकेतून हरीशनं सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यात ‘नकळत सारे घडले’, ‘सरस्वती’, ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. फक्त मालिकाच नव्हे तर अनेक मराठी चित्रपटातही तो झळकला. पावनखिंड’, ‘शिवप्रताप गरुडडझेप’, ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’ अशा ऐतिहासिक सिनेमांत काम केलं आहे. सध्या हरिश रत्नाकर मतकरी लिखीत ‘काळी राणी’ नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.