अंकित मोहन मराठीतील लोकप्रिय अभिनेता मानला जातो. मालिका, चित्रपटांमधून अंकितने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीबरोबर हिंदी मालिकांमध्येही अंकितने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अंकितने मराठीतील अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महाभारत या हिंदी मालिकेमधून अंकितला खरी ओळख मिळाली. फर्जंद या चित्रपटातून अंकितने मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केलं.
हेही वााच- कानटोपी, स्वेटर अन्…; आकाश ठोसरची केदारनाथ सफर, फोटोने वेधलं लक्ष
अंकित सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतचं अंकितने आपल्या इन्स्टाग्रामवर रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो शेअर करत अंकितने लिहिलं मेरे देवता , मेरे राजे, मेरे भगवान, मेरे राजे…मेरे राजे मेरे साथ तो चिंता की कोई नहीं बात. छत्रपति शिवाजी महाराज की जय” या फोटोमधील अंकितच्या हातावरचा टॅटू सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. अंकितने हातावर ‘राजे’ असं गोंदवून घेतलं आहे.
अंकितने आत्तापर्यंत शिवाजी महाराजांवर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलं. ‘फर्जंद’ चित्रपटात त्याने साकारलेली कोंडाजी फर्जंद भूमिका चांगलीच गाजली. तसेच ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ चित्रपटात त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. पावनखिंड चित्रपटात त्याने रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली होती. आता लवकरच त्याचे ‘रामशेज’ आणि ‘मुरारबाजी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे