‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सहा बहिणींची कहाणी सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आणि रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम करण्याचा अनुभव अभिनेता पियुष रानडेने सांगितला आहे.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

पियुष रानडेने चित्रपटात चारू म्हणजेच दीपा परबच्या पतीची भूमिका साकारली आहे. छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या पियुषने चित्रपट सुपरहिट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “या सुपरहिट चित्रपटाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. माझी भूमिका लहान आहे, पण महत्त्वाची आहे. माझ्या भूमिकेबद्दलचे रील्स पाहून मला जाणवलं की लोकांनी मला लक्षात ठेवलंय. खरं तर कोणतेही पात्र लहान-मोठे नसते, तर कलाकार असतो. मी छोटा कलाकार असू शकतो, पण ते पात्र खूप मोठे आहे,” असं पियुष म्हणाला.

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने व दीपा परब यांनी सहा बहिणींची भूमिका साकारली आहे. या सहा जणींबरोबर काम करण्याचा अनुभव पियुषने सांगितला. “रोहिणीताई, वंदनाताई, सुकन्याताई या शाळा आहेत. त्यांच्याबरोबर काम केल्याने कलाकार म्हणून तुम्ही खूप पॉलिश होता. त्या खूप सहज अभिनय करतात. बाईपण भारी देवा पाहून जेव्हा कुणी त्यांचं कौतुक करतं ना तेव्हा मी म्हणतो, त्याच्यांसाठी अभिनय म्हणजे सकाळी उठून आवरणं, ब्रश करण्याइतकं सहज आहे. अभिनय त्यांच्यासाठी रुटीन आहे. त्या येतात, काम करतात आणि जातात, पण चित्रपट पाहिल्यावर वाटतं की त्यांनी किती भारी काम केलंय,” असं पियुषने सांगितलं.

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण फोन करून, मेसेज करून माझ्या भूमिकेचं कौतुक करत आहेत. ही खूप मोठी गोष्ट असल्याचं पियुष म्हणाला. दरम्यान, या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच हा मराठीतील एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.