प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचं निधन दोन ते तीन दिवसांआधी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पुणे: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

Shukraditya
तब्बल एका वर्षांनंतर चंद्राच्या राशीमध्ये निर्माण होणार ‘शुक्रादित्य राजयोग’, ‘या’ ३ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ
Shani vakri these five zodiac signs will get a lot of money
४ दिवसांनंतर घरी नांदणार लक्ष्मी; शनि वक्री होताच ‘या’ पाच राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा
nashik district bank loan scam
अद्वय हिरे यांच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ
Virar, Woman, died,
विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला बेपत्ता वृद्धेचा मृतदेह
After 12 years Gajakesari Raja Yoga was created in Virgo
तब्बल १२ वर्षांनंतर कन्या राशीत निर्माण झाला ‘गजकेसरी राजयोग’; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
yavatmal marriage ceremony
शुभमंगल सावधान! सर्वधर्मीय १०८ जोडप्यांचा शाही सामूहिक विवाह सोहळा, ३० वर्षांत २२०० वधु-वरांचे शुभविवाह
Eight people died due to rain in Marathwada in seven days
मराठवाड्यात सात दिवसांत पावसामुळे आठ जणांचा मृत्यू; सर्वाधिक चार मृत्यू लातूरमध्ये
Guru Transit In Rohini Nakshatra
गुरु झाले स्वामी, धनलाभाची संधी नामी! शनी जयंतीनंतर ५८ दिवस प्रचंड श्रीमंती व आनंद मिळवतील ‘या’ ३ राशी, वाटा लाडू पेढे

तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितलं की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महाजनी यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. गेल्या आठ महिन्यांपासून ते एकटेच या घरात राहत होते. पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आमच्या टीमने दरवाजा तोडला आणि फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,” असंही ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”

रवींद्र महाजनी यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी कळवलं आहे. गश्मीर मुंबईला राहतो, माहिती मिळताच तो तळेगाव तिथे येण्यासाठी रवाना झाला आहे. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल, तसेच मृत्यूचं कारणही कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, महाजनी यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.