प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचं निधन दोन ते तीन दिवसांआधी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितलं की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महाजनी यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. गेल्या आठ महिन्यांपासून ते एकटेच या घरात राहत होते. पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आमच्या टीमने दरवाजा तोडला आणि फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,” असंही ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”

रवींद्र महाजनी यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी कळवलं आहे. गश्मीर मुंबईला राहतो, माहिती मिळताच तो तळेगाव तिथे येण्यासाठी रवाना झाला आहे. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल, तसेच मृत्यूचं कारणही कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, महाजनी यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police said ravindra mahajani passed away three days ago they informed his son gashmeer mahajani hrc
First published on: 15-07-2023 at 07:51 IST