पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. साखरपुडा, संगीत आणि मेहंदी सोहळ्यानंतर आता पूजाला सिद्धेशच्या नावाची हळद लागली आहे.
पूजाच्या हळदी समारंभातील खास क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीची बहीण रुचिरा सावंतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हळदीचा मंडप, सुंदर सजावट, आई-बाबांची सुरू असलेली लगबग, तिच्या आईचा पिवळ्या साडीतील लूक, करवली असा संदेश लिहिलेले हटके कानातले याची खास झलक शेअर केली आहे.
हेही वाचा : पती डॉक्टर, तर माधुरी दीक्षितच्या सासऱ्यांचं शिक्षण किती? म्हणाले, “१९६३ ला इंग्लंडला गेलो अन्…”
पूजाने हळदी समारंभासाठी खास जांभळ्या रंगाच्या लेहेंग्याची निवड केली आहे. सुंदर लेहेंगा, आकर्षक हेअरस्टाइल, हातात हिरवा चुडा अन् सिद्धेशची नवरी असं लिहिलेली कलाई असा खास लूक अभिनेत्रीने हळदी समारंभासाठी केला होता. यावेळी पूजा-सिद्धेशने प्रीती झिंटाच्या “बुमरो…” या लोकप्रिय गाण्यावर डान्स सुद्धा केला.
हेही वाचा : अखेर मानसी नाईक पतीपासून विभक्त! घटस्फोट होताच व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता…”
सध्या पूजा-सिद्धेशवर मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, सुखदा खांडकेकर यांच्यासह पूजाच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हळदी समारंभाला खास उपस्थिती लावली आहे. आता येत्या दोन दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.