मराठी कलाविश्वातील ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतने २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. गेल्या महिन्याभरापासून पूजाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. साखरपुडा, संगीत, मेहंदी, हळद, ग्रहमख असे परंपरेनुसार सगळे विधी करत अभिनेत्रीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजाच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. लग्नसोहळा पार पडल्यावर आता मराठी परंपरेनुसार पूजाने नवऱ्यासह जोडीने सत्यनारायण पूजा केली आहे. याचे खास फोटो अभिनेत्रीच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…

सत्यनारायण पूजेला बसताना पूजाने निळ्या रंगाची साडी, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, हिरवा चुडा असा पारंपरिक लूक केला होता. तर तिचा पती सिद्धेश चव्हाणने पिस्ता रंगाचा सदरा परिधान केला होता. पूजाच्या माहेरचे आणि सासरचे असे सगळेजण या पूजेला उपस्थित होते.

सत्यनारायण पूजा

हेही वाचा : Video : गुडन्यूज दिल्यावर जामनगरमध्ये दीपिकाचं जोरदार स्वागत, चाहत्यांनी घेरल्यावर बायकोला सांभाळताना दिसला रणवीर सिंह

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण

दरम्यान, पूजा सावंतचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेत्रीने सिद्धेशबरोबरचा पहिला फोटो शेअर केला होता. तिचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. थाटामाटात लग्न पार पडल्यावर आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर केव्हा झळकणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant and siddhesh chavan performed satyanarayan pooja after marriage sva 00